Nobel Prize in Economics | बेन बर्नान्के, डग्लस डायमंड आणि फिलिप डायबविग यांना नोबेल पुरस्कार जाहीर

टीम महाराष्ट्र देशा : आज सोमवार दि. 10 ऑक्टोबर 2022 रोजी नोबेल समितीने अर्थशास्त्र क्षेत्रातील नोबेल पारितोषिकाची घोषणा केली आहे. यामध्ये बेन बर्नान्के, डग्लस डायमंड आणि फिलिप डायबविग यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. नोबेल समितीने संयुक्तपणे यांच्या नावाची निवड केली आहे. या तिघांना आर्थिक संकटाच्या वेळी महत्त्वाची भूमिका बजावली आहे म्हणून यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर केला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, बेन बर्नान्के, डग्लस डायमंड आणि फिलिप डायबविग यांनी आर्थिक संकटाच्या वेळी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अर्थव्यवस्थेमधील बँकेच्या भूमिकेत त्यांनी लक्षणीय रित्या कामगिरी करून बँकेची परिस्थिती सुधारली आहे. बँकेची पडझड टाळणे का महत्त्वाचे आहे हे त्यांनी त्यांच्या संशोधनात सांगितले आहे.

1969 मध्ये अर्थशास्त्र क्षेत्रातील प्रथम नोबेल पारितोषिक जाहीर झाले होते. तर, 2021 मध्ये डेव्हिड कार्ड आणि जोशुआ अँग्रिस्ट आणि गुइडो इम्बेन्स यांना अर्थशास्त्र क्षेत्रातील नोबेल पारितोषिक दिले होते. ‘हाऊ मिनिमम वेज, इमिग्रेशन अँड एज्युकेशन इफेक्ट द लेबर मार्केट’ या संशोधनासाठी डेव्हिड कार्ड यांना नोबेल पारितोषिक मिळाले होते.

स्टॉकहोममधील रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या नोबेल समितीने बेन बर्नान्के, डग्लस डायमंड आणि फिलिप डायबविग यांना अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर केले आहे . या पुरस्कारामध्ये 10 दशलक्ष स्वीडिंग क्रोनर (9 दशलक्ष डॉलर) रोख रक्कम दिली जाते. या तिघांना हा पुरस्कार 10 डिसेंबर 2022 रोजी प्रदान करण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.