Nokia Mobile Launch | नोकियाने लाँच केला नवा Flip मोबाईल

टीम महाराष्ट्र देशा: आजकाल बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात सर्वच मोबाईल (Mobile) उत्पादक कंपन्या बदलत्या फीचर नुसार आपले नवनवीन मोबाईल लाँच करत आहे. अशा परिस्थितीत नोकिया (Nokia) ने नुकताच आपला नवीन मोबाईल लाँच केला आहे. नोकिया आपला Nokia 2780 Flip हा मोबाइल आपल्या ग्राहकांसाठी घेऊन आला आहे. कंपनीचा हा फोन Qualcomm 215 प्रोसेसरसह सुसज्ज आहे. नोकियाचा हा नवीन मोबाईल नक्कीच एक फीचर फोन असला तरी यामध्ये युट्युब आणि गुगल यासारखे ॲप चालू शकतात.

Nokia 2780 Flip फीचर्स

Nokia 2780 Flip हा एक फ्लिप फोन असल्यामुळे यामध्ये दोन डिस्प्ले उपलब्ध आहेत. यामध्ये 2.7 इंच मुख्य TFT स्क्रिन आणि 1.77 इंच सेकंडरी स्क्रीन आहे. त्याचबरोबर 320× 240 पिक्सल रीसोल्युशन QVGA डिस्प्ले आहे. या फोनमध्ये Qualcomm 215 प्रोसेसर देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या फोनचा कॅमेरा बद्दल बोलायचे झाले, तर या फोनमध्ये 5MP चा सिंगल रियल कॅमेरा दिलेला असून फ्लॅश लाईट देखील उपलब्ध आहे.

या फोनचा स्टोरेज बद्दल सांगायचे झाले तर या फोनमध्ये 4जीबी रॅम आणि 512एमबी इंटरनल स्टोरेज दिलेले आहे. वर या फोनमध्ये मेमरी कार्डद्वारे ३२ जीबी पर्यंत फोनची मेमरी वाढवता येऊ शकते. Nokia 2780 Flip या मोबाईल मध्ये 1,450mAh बॅटरी आहे. ही बॅटरी काढता येण्यासारखी आहे. कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार 4G सिम वर या फोनची बॅटरी 18 दिवस टिकू शकते.

किंमत

Nokia 2780 Flip हा फोन सध्या US लाँच करण्यात आला आहे. US मध्ये या फोनची किंमत सुमारे $90 म्हणजेच 7,450 रुपये एवढी ठेवली आहे. हा फोन भारतामध्ये कधी लाँच होईल याबद्दल अद्यापही कोणती माहिती कंपनीकडून मिळालेली नाही. मात्र, कंपनी आपला हा फोन भारतातील लवकरच लाँच करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.