InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

महाराष्ट्रातले अनेक प्रमुख नेते शिवसेनेच्या वाटेवर – संजय राऊत

- Advertisement -

पंकजा मुंडेच काय, तर राज्यातील अनेक बडे नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. शिवाय, पंकजा मुंडेंबाबत 12 डिसेंबरलाच कळेल, असंही राऊतांनी स्पष्ट केलं आहे. पंकजा मुंडे यांच्या कालच्या फेसबुक पोस्ट आणि आज ट्विटर हॅण्डलवर भाजपचा उल्लेख नसल्याने, त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना राऊतांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या ट्विटर हॅण्डलवर सध्या भारतीय जनता पक्षाचा उल्लेख नाही. ट्विटर हॅण्टलवरील बायोमधून पंकजा मुंडे यांनी भाजपच्या पदाचा उल्लेख हटवला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत तर्कवितर्क काढले जात आहेत. या संदर्भात संजय राऊत म्हणाले की, “शिवसेनेच्या वाटेवर अनेक प्रमुख लोक आहेत. मी आता नाव घेत नाही. पंकजा मुंडेंबाबत 12 डिसेंबरलाच कळेल. महाराष्ट्रातले अनेक प्रमुख नेते शिवसेनेच्या वाटेवर आहेत.”

Loading...

- Advertisement -

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.