माणसांनाच नाही तर राज्यातल्या देवांनाही आता कोरोनाची भीती !

कोरोना व्हायरसने चीनसह जगातील इतर देशांना हादरवून सोडले आहे. भारतातही कोरोनाचे ३१ लागण झालेले रुग्ण आढळले आहेत.आता माणसांबरोबरच महाराष्ट्रातल्या देवांनीही कोरोनाचा धसका घेतला आहे.

 

शिर्डी, पंढरपूर, आणि कोल्हापूर,त्र्यंबकेश्वर या सर्व देवस्थानांनी सध्या कोरोना व्हायरसचा धसका घेतला आहे. देश-विदेशातून इथं भाविक दर्शनासाठी येतात, ज्यामुळं कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सगळ्याच देवस्थानांनी खबरदारीचे उपाय आखायला सुरूवात केली आहे.

 

शिर्डीमध्ये मंदिर पूर्णपणे स्वच्छ आणि निर्जंतुक करण्याचं कामही सुरू झालं आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जात आहे.त्र्यंबकेश्वर मंदिर पूर्णपणे स्वच्छ आणि निर्जंतुक करण्याचं कामही सुरू झालं आहे.कोरोनामुळं पंढरपुरात दिवसातून सहा ते सात वेळा स्वच्छता केली जात आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.