सगळ्या कॉम्प्लेक्सला नाही तर फक्त स्टेडियमला मोदींचं नाव दिले ; प्रकाश जावडेकर

जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम गुजरातच्या अहमदाबादमध्ये उभारलं आहे. सध्या या स्टेडियमवर भारत वि. इंग्लंड यांच्यात कसोटी सामना खेळला जात आहे. जगातील सर्वात जास्त प्रेक्षक संख्या असलेलं स्टेडियम आता ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ या नावाने ओळखलं जाणार आहे.

परंतु या नामांतरावरुन सर्वच स्तरातून मोदी सरकारवर टीका केली जात आहे. तसेच काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये आता जोरदार वाक् युद्ध सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा अपमान असल्याचं काँग्रेस नेत्यांनी म्हटलंय. काँग्रेसच्या या टीकेला उत्तर देताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय.

‘या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं नावं सरदार पटेल स्पोर्ट्स एन्क्लेव्ह असं आहे. संकुलातील क्रिकेट स्टेडियमला फक्त पंतप्रधान मोदी यांचं नाव देण्यात आलं आहे. विडंबन या गोष्टीचं आहे की, ज्या परिवाराने सरदार पटेल यांच्या मृत्यूनंतरही त्यांचा सन्मान केला नाही. ते आता रडत आहेत’, अशा शब्दात जावडेकर यांनी गांधी परिवार आणि काँग्रेसवर टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा