InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मोदींना औरंगजेब म्हणल्याने संजय निरुपम यांना निवडणूक आयोगाची नोटीस

पंतप्रधान मोदींनी औरंगजेब बोलणे संजय निरुपम यांना महागात पडले आहे. काँग्रेसचे मुंबईतील नेते संजय निरूपम यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेवरून ते पाऊल उचलण्यात आले. निरूपम यांना उत्तर देण्यासाठी 24 तासांची मुदत देण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल घेत प्रथमदर्शनी ते वक्तव्य निवडणूक आचारसंहितेचा भंग करणारे असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

निरूपम यांची उत्तरप्रदेशातील वाराणसी या मोदींच्या मतदारसंघात सभा झाली. मोदींच्या निर्देशावरून वाराणसीत कॉरीडॉरच्या नावाखाली अनेक मंदिरे पाडण्यात आली. त्यामुळे मोदींच्या रूपाने जनतेने आधुनिक काळातील औरंगजेबालाच निवडून दिले आहे असे निरूपम म्हणाले होते.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.