ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिकला कारणे दाखवा नोटीस

ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिकला कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय) परवानगी न घेता राष्ट्रीय शिबिर सोडल्याबद्दल कारणे दाखवा नोटी स बजावली आहे. लखनऊ येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या केंद्रात सुरू असलेल्या शिबिरातील ४५ पैकी २५ महिला कुस्तीपटूंनी कोणतीही परवानगी न घेता शिबिरातून बाहेर पडल्या आहेत.

शिबिरातून २५ खेळाडूंची हकालपट्टी करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे या खेळाडूंमध्ये ऑलिम्पिक पदकविजेती साक्षी मलिक (६२किलो), सीमा बिस्ला (५० किलोग्राम) आणि किरण (७६ किलोग्राम) या तीन स्पर्धकांचाही समावेश आहे. या तिघांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून त्यांचे उत्तर सादर करण्याची अंतिम मुदत २१ ऑगस्ट (बुधवार) पर्यंत आहे.

डब्ल्यूएफआयचे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांच्या मते, भारतीय संघातील खेळाडू सराव स्पर्धांसाठी बेलारुस आणि इस्टोनिया येथे रवाना झाल्यावर उरलेल्या खेळाडूंनी शिबिरातून बाहेर जाण्याचे ठरविलं होतं. यासाठी इतर खेळाडूंनी कोणतीही परवानगी घेतली नव्हती. इतर सर्व खेळाडूंना डब्ल्यूएफआयच्या पुढच्या आदेशापर्यंत राष्ट्रीय शिबिरातून हद्दपार करण्यात आले आहे. ऑलिम्पिकमध्ये नसलेल्या चार खेळाडूंना चाचणीसाठी सहभागी होता येणार नाही.

महत्वाच्या बातम्या-

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.