InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

आता ‘भाईजान’ मध्य प्रदेशातून लढवणार लोकसभा ?

लोकसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसे सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या हालचाली वेगवान केल्या आहेत. सर्वच राजकीय पक्ष प्रतिस्पर्ध्यांपेक्षा ताकदवान उमेदवार शोधत आहेत. कुणी त्या त्या मतदारसंघातील ताकदवान नेता, तर कुणी थेट सेलिब्रिटींना मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे.

मध्य प्रदेशमधील इंदौरमतून अभिनेता सलमान खान याला लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचा विचार काँग्रेसकडून केला जातो आहे. मध्य प्रदेशचे काँग्रेस सचिव राकेश यादव यांनी अभिनेता सलमान खान याने इंदौरमधून लढावं, यासाठी विनंती केल्याचे सांगितले.

सलमान आणि इंदौरचं नातं

अभिनेता सलमान खान याचे वडील म्हणजे हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ संवादलेखक सलीम खान हे मूळचे मध्य प्रदेशातील इंदौरमधीलच आहेत. मात्र, तरुण वयात नोकरीच्या निमित्ताने ते मुंबईत ले आणि मुंबईतच स्थायिक झाले. त्यांच्या लेखनाने अनेक मोठ्या अभिनेत्यांना घडवलं, अनेक अजरामर सिनेमे त्यांच्या लेखनीतून साकारले आहेत. एकंदरीत सलमान खान याचं मध्य प्रदेशातील इंदौरशी नातं आहे. त्यामुळे त्या अनुषंघाने सलमान खानला इंदौरमधून लोकसभेसाठी उतरवण्याची इच्छा काँग्रेसच्या प्रदेश सचिवाने व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.