आता भाजपने नवीन शिवव्याख्याते निर्माण केलेत; संजय राऊतांचा राज्यपालांना खोचक टोला

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यामुळं राज्यपाल पुन्हा वादात सापडण्याची चिन्हं आहेत. औरंगाबादेत समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात राज्यपाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव, मराठी राजभाषा दिन आणि श्री दास नवमी निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कोश्यारी बोलत होते.

यावेळी बोलताना कोश्यारी यांनी म्हटलं की, चाणक्याविना चंद्रगुप्तांना कोण विचारेल? समर्थांविना शिवाजी महाराजांना कोण विचारणार? असं राज्यपालांनी म्हटलं आहे. गुरुचे महत्त्व मोठे आहे. समर्थ रामदासांच्या स्वप्नातील भारत साकारला पाहिजे. संतांच्या मार्गावर चालल्यास भविष्य उज्ज्वल आहे, असंही ते म्हणाले होते. या वादग्रस्त विधानावरून राज्यातील वातावरण तापलं आहे.

यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया देत राज्यपालांवर निशाणा साधलाय. भाजपने नवीन शिवव्याख्याते निर्माण केले आहेत. त्या संदर्भात भाजपनेच आता भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असं संजय राऊत यांनी म्हटलं. राऊत पुढे म्हणाले की, असं विधान दुसरं कुणी केलं असतं तर भाजपच्या लोकांनी आतापर्यंत रस्त्यावर उतरुन गोंधळ घातला असता.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा