आता फडणवीसांना दिवसाही स्वप्नं पडू लागलीत; नाना पटोलेंचा मिस्कील टोला

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. ते म्हणाले होते कि, ‘मला अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटत आहे कारण जनता मला तेवढं प्रेम देत आहे’. यानंतर यावरून अजूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया येणे सुरूच आहे. याच मुद्द्यावरून आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.

पाटोळे म्हणाले कि, ‘माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमचे चांगले मित्र आहेत. त्यांच्याबद्दल फार काही बोललेच पाहिजे, असे नाही. पूर्वी फडणवीसांना पहाटे स्वप्न पडायची. पण आता तर त्यांना दिवसाही स्वप्न पडत आहेत, हे काही बरोबर नाही.’ असा मिस्कील टोमणा नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीसांना आज हाणला.

तसेच, आजच्या परिस्थितीत राज्य सरकारजवळ जे काही आर्थिक स्रोत आहेत, त्या आधारावर शेतकऱ्यांची दिवाळी चांगली जावी, याची व्यवस्था सरकारने केलेली आहे. झालेल्या नुकसानाची भरपाई १५ हजार कोटी आहे आणि ती केंद्र सरकारची जबाबदारी आहे. आतापर्यंत केंद्राने महाराष्ट्राचे केलेले नुकसान जनतेने पाहिले आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा