‘आता गोकुळचा दबदबा मुंबईत वाढवणार ‘सतेज पाटलांचं ठरलयं!

कोल्हापूर : महाराष्ट्रात सर्वात जास्त चर्चेत असणारी निवडणुक म्हणजे गोकुळ दूधसंघ. २ मे ला निवडणुक झाली आणि आज निकाल लागला. अखेर ३ दशकांपासूनची महाडिकांची निर्विवाद सत्ता सतेज पाटील यांनी मोडीत काढली आणि गोकुळ हाती घेतलं आहे .’आमचं ठरलयं गोकुळ उरलयं’ असं म्हणत लोकसभा,विधानसभेनंतर गोकुळकड् केलेली कुच सतेज पाटलांनी यशस्वी केली. गोकुळच्या २१ जागांपैकी १७ जागा मिळवत सतेज पाटील गटाने ‘गोकुळ’मध्ये सत्तांतर घडवून आणलं आहे. सत्ताधारी महाडिक गटाला अवघ्या ४ जागांवर समाधान मानावं लागलं आहे.

हा निकाल सतेज पाटलांच्या राजकीय कारकीर्दीसाठी महत्वाचा आहेचं कारण महाडिक गटाला शह देण्यासाठी गोकुळ हातात घेणं महत्वाचं होतं. या निकालावर प्रतिक्रिया देताना पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले की, दूध उत्पादकांनी राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीला १७ जागा देत चांगलं यश दिलं आहे. सर्व दूध उत्पादकांचे मनापासून डोकं टेकवून मी आभार मानतो.

निवडणुका संपल्यात, कोणी काय केलं याऐवजी आम्ही काय करणार याकडे लक्ष देणार आहे. आता आमचा नवा अजेंडा आहे. मुंबईत गोकुळचा दबदबा वाढवणार असून शेतकऱ्यांना २ रुपये दर वाढवून देणार आहोत. निवडणुकीत दिलेलं आश्वासन मागे पडणार नाही. काही उणिवा दूर करण्यासाठी आम्हाला थोडा वेळ द्या असं सतेज पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.