InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

आता मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वात २० रुपयांचं नाणं बाजारात येणार

मोदी सरकार-१ च्या कार्यकाळात २०० आणि २००० रुपयांची नोट नव्याने दाखल झाली. आता मोदी २.० मध्ये २० रुपयांचं नाणं बाजारात येणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्पीय भाषणात केली.

सध्या अस्तित्वात असलेली १, २, ५ आणि १० रुपयांची नाणीही नव्या रूपात चलनात येणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं. अंध व्यक्तींनाही सहज ओळखता येतील, अशी खास व्यवस्था या नाण्यांमध्ये केली जाणार आहे.

मार्च महिन्यात मोदी सरकारने २० रुपयांचे नाणे चलनात आणण्याची घोषणा केली होती. या नाण्याला १२ कडा असणार आहेत. पूर्वी दोन रुपयांचे नाणे या आकारात होते. तसेच याचा व्यास २७ मिमी आणि वजन ८.५४ ग्रॅम असणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply