हिंदूविरोधी ठाकरे सरकारची आता या हंडी फोडण्याची वेळ आलीये : अतुल भातखळकर

मुंबई : कोरोनामुळे गेले २ वर्षे झाली सर्व सण उत्सवांवर बंदी घालण्यात आली आहे. आगामी काळात दहीहंडी उत्सवाला मुंबईसहीत महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारने परवानगी नाकारली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्रातल्या गोविंदा पथकांच्या प्रतिनिधीसोबत घेतलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.

यावरून विरोधक आता आक्रमक पाहायला मिळत आहे.पारंपरिक दहीहंडी उत्सवाला परवानगी नाकारण्यात आल्याने भाजपाने महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले आहे. भाजपा नेते अतुल भातखळकर यांनीदेखील ठाकरे सरकार हिंदूविरोधी असल्याचे बोलले आहे. याबाबत त्यांनी ट्विटसुद्धा केले आहे. त्यांच्या या ट्विटची चांगलीच चर्चा होत आहे.

यावेळी अतुल भातखळकर ट्विट करत म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांचा मोगली वरवंटा हिंदू समाजावर चालतोच आहे. मंदिर उघडण्याच्या मागणीला सतत वाटाण्याच्या अक्षता लावणाऱ्या हिंदूविरोधी ठाकरे सरकारने समन्वय समितीने केलेल्या तमाम सूचना धुडकावत दहीहंडी उत्सवावर बंदी लादली. या सरकारची हंडी फोडण्याची वेळ आलीये.”

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा