नरेंद्र मोदींची आता झोळी घेऊन जाण्याची वेळ आली; काँग्रेसचं टीकास्त्र

नवी दिल्ली : देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. कोरोनामुळे काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 54,069 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,321 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,91,981 लोकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती, लसीकरण यावरून मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात येत आहे. अनेकांनी विविध मुद्द्यांवरून निशाणा साधला आहे.

याच दरम्यान उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका सध्या चर्चेचा विषय झाला आहे. याच विषयावर एका वाहिनीने घेतलेल्या चर्चासत्रादरम्यान काँग्रेसच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. या चर्चासत्रात बोलताना काँग्रेस प्रवक्त्या रागिणी नायक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. मोदींना ना कोरोना आवरता येतोय ना सत्ता. असं वाटतंय की आता झोळी घेऊन निघून जाण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात रागिनी नायक यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि नरेंद्र मोदी दोघेही एकमेकांवर वरचढ होण्यासाठी पाहत आहेत. तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं एकमेकांशी पटत नाही. भाजपशासित राज्यांमध्ये नुसता गोंधळ माजला असल्याचं रागिनी नायक यांनी म्हटलं आहे. कोरोना असो नाहीतर सत्ता दोन्हीही मोदीजींच्या हाताबाहेर जाऊ लागलेत. आता असं वाटतंय की बहुतेक झोळी घेऊन निघून जाण्याची वेळ आलेली आहे, असं रागिनी नायक यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा