एक मुहूर्त हुकला, आता दसऱ्याला सीमोल्लंघन करणार का? खडसे म्हणतात…

रावेर: भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि राज्याचे गृहमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची आज रावेरच्या शासकीय विश्रामगृहात भेट झाली.त्यावेळी विश्रामगृहाबाहेर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रच्चंड गर्दी केली होती. या देशमुख आणि खडसे यांच्या भेटीतून काही नवे घडणार का?याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

खडसे समर्थकांनी देखील पक्ष सोडून योग्य निर्णय घ्यावा अशा मागणीचा सूर वाढत होता. काल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील स्थानिक कार्यकर्त्यांनी खडसेंची भेट घेतल्यानंतर खडसेंच्या पक्षप्रवेशावर जवळजवळ शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात होतं. तर, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकनाथ खडसेंच्या पदावरून व आमदारकी वरून चाचपणी देखील पूर्ण झाली असून घटस्थापनेच्या मुहूर्तावर खडसे आपल्या सर्मथकांसह प्रवेश करणार अशा चर्चांना उधाण आलं होत. मात्र खडसेंनी पुन्हा एकदा पक्ष बदलावर हुलकावणी दिली आहे.

योग्य वेळ येईल – खडसे

खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांना ठाकरे सरकारमध्ये थेट कृषिमंत्रीपद मिळणार असल्याचं सूत्रांतर्फे सांगण्यात आलं होतं. दरम्यान, “राष्ट्रवादी प्रवेशाबाबत मला काहीच बोलायचे नाही, नो कमेंट्स” अशी प्रतिक्रिया देत आळीमिळी गुपचिळी कायम ठेवली. तर, “माझ्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबतचे सारे मुहूर्त तुमचेच आहेत”, असा टोला देखील त्यांनी लगावला. एवढंच नाही तर योग्य वेळ येईल. वाट पाहा, असं सूचक वक्तव्य देखील एकनाथ खडसेंनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा