‘आता उद्धवचा काळ संपला, पुन्हा भाजपची सत्ता येणार’; नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला आज मुंबईतून सुरुवात झाली आहे. त्यांची ही जन आशीर्वाद यात्रा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राहात असलेल्या कलानगर येथे पोहचली. मातोश्रीच्या अंगणात शिवसेनेतून भाजपमध्ये गेलेल्या तृप्ती सावंत यांनी नारायण राणेंचं जंगी स्वागत केलं. यावेळी राणेंनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. तसेच मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित राहिल्यानंतर आपण नवीन मंत्री झालो असे अजिबात वाटले नाही.

यावेळी बोलताना नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. मी महाराष्ट्राचं नाव दिल्लीत उंचावल्याशिवाय राहणार नाही. येणाऱ्या मुंबई महानगरापालिकेची सत्ता शिवसेनेच्या हातात राहणार नाही. येत्या काळात जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेल. जनतेने अशीच साथ द्यावी. जनता महाविकास आघाडीच्या, शिवसेनेच्या कारभाराला कंटाळली आहे. त्यामुळे शिवसेनेला मुंबई महापालिकेतून हद्दपार करा, असं आवाहन नारायण राणे यांनी केलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला उद्ध्वस्त करायला निघाले आहेत. पण सांगू इच्छितो की, तुमचा काळ संपलाय. राज्यात पुन्हा भाजपचे सरकार येणार आहे, आपल्याला आपलं राज्य वाचवायचं आहे. राज्य उद्ध्वस्त करणाऱ्यांना सत्तेतून खाली खेचायचंय, अशा शब्दात नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. मुंबईतील पहिल्या भाषणामध्ये राणेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा