InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

आता दोन दिवसांत मोबाईल नंबर होणार पोर्ट

ग्राहकांना आपल्याकडे ओढण्यासाठी कंपन्यांकडून नवनव्या ऑफर देण्यात येतात. पण काहीवेळा मोबाईल कंपनी बंद होत असल्यामुळे किंवा कंपनीकडून चांगली सेवा न दिल्याने ग्राहक आपला नंबर दुसऱ्या कंपनीत पोर्ट करतात. पोर्ट करताना ग्राहकाला किमान आठवडाभर वाट पाहावी लागते. यामुळे ग्राहकाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पण आता नंबर पोर्टिग करण्याची प्रक्रिया सोप्पी आणि जलद झाली आहे.

भारतीय दूरसंचार नियामक आयोगाने (trai) या नियमात बदल केले आहेत. आता मोबाईल नंबर पोर्ट करण्यासाठी केवळ दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे. दोन दिवसांत मोबाईल नंबर पोर्ट होणार आहे.

एका सर्कलमधील मोबाईल नंबर पोर्ट करायचा असल्यास दोन दिवसांत ही प्रकिया पूर्ण होणार. दोन वेगळ्या सर्कलमधील मोबाईल नंबर पोर्ट करायचे असतील तर यासाठी चार दिवसांचा वेळ लागणार असल्याची माहिती ‘ट्रायने’ दिली.

अशी आहे प्रक्रिया….

ग्राहकाला मोबाईल नंबर पोर्ट करण्यासाठी, एक युपीसी कोड  तयार करावा लागतो. यासाठी आपल्या मोबाईल वरुन PORT टाईप केल्यावर एक स्पेस देऊन १९०० या नंबरवर मेसेज पाठवायचा आहे. यानंतर ग्राहकाला यूपीसी कोड पाठवला जातो. हा कोड सर्व्हिस प्रोव्हायडर बदलताना द्यावा लागेल. सोबतच ग्राहकाला आधार नंबर द्यावा लागेल. तसेच एक फॉर्म भरावा लागणार आहे. याआधी जर ग्राहक पोस्टपेड असेल तर जुने बिल नजीकच्या कार्यालयात जमा करावे लागते.

दुसऱ्या मोबाईल नेटवर्क मध्ये नंबर पोर्ट करण्यासाठी ४ रुपये द्यावे लागतील. आधी हे दर १९ रुपये होते. नव्या नेटवर्कमध्ये प्रवेश होण्याआधी जुने सीमकार्ड मधील नेटवर्क निघून जाणार. यानंतर ग्राहकाला जुने सीमकार्ड काढून नवे सीमकार्ड टाकावे लागणार आहे. नवे सीम टाकल्यानंतर काही तासाने नेटवर्क येईल.

महत्वाच्या बातम्या –

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.