“आता राष्ट्रवादीवाले बाॅलिवूडची पण भांडी घासायला लागलेत”

मुंबई : सध्या देशात आर्यन खान प्रकरणाने देशात खळबळ उडाली आहे. एनसीबीने मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका आलिशान क्रुझवर छापा टाकत ड्रग्स पार्टीचा पर्दाफाश केला. या प्रकरणात बॉलिवूड किंग खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी या प्रकरणी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले होते.

मलिक म्हणाले कि, आर्यन खान प्रकरणात कुठलंही ड्रग्ज सापडलेलं नाही. तर भाजप हे बॉलिवूड आणि राज्य सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे, आर्यन खानसोबत व्हायरल झालेल्या फोटोत दिसणाऱ्या मनिष भानुशाली याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतही फोटो आहेत. त्यामुळे एनसीबीनं सांगावं त्यांचा आणि भानुशालीचा संबंध काय?, असा सवाल मलिक यांनी विचारला होता.

यावर आता भाजप यावर उत्तर देताना माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विट करत राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आहे. नवाब मलिक महाराष्ट्र राज्याचे मंत्री आहेत याची खंत वाटते. जो ड्रग्सला समर्थन करतोय आणि ज्या अधिकाऱ्यांनी ट्रॅप लावून एक रॅकेट उधवस्त केलं त्यांच्यावर संशय घेतोय. आता राष्ट्रवादीवाले बॉलीवूडची पण भांडी घासायला लागले. काही महिन्यापूर्वी मलिकचा जावई ड्रग्समध्ये पकडला गेला होता, अशी खरमरीत टीका निलेश राणे यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा