संपूर्ण देशभरात राष्ट्रीय नागरिक नोंदणी लागू होणार – अमित शाह

संपूर्ण देशभरात एनआरसी लागू केली जाईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री यांनी आज संसदेत केली. राज्यसभेत गृहमंत्री अमित शहा यांनी एनआरसीबाबत विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना त्यांनी ही घोषणा केली. तसेच, कोणत्याही धर्माच्या लोकांना यामुळे घाबरण्याचे कारण नाही.’ असेही ते म्हणाले. आसाममध्ये सर्वात आधी एनआरसी लागू करण्यात आली आहे, यातून 19 लाख लोकांना बाहेर करण्यात आले आहे.

अवैध घुसखोरांना पिटाळून लावण्यासाठी देशभरात ‘राष्ट्रीय नागरिक नोंदणी’ अर्थात ‘एनआरसी’ लागू करणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी स्पष्ट केले आहे. यावरुन पहिल्यापासून विरोधकांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. तर, कोणासोबतही भेदभाव केला जाणार नसून देशाचे नागरिकत्व सिद्ध करणाऱ्याला देशात राहण्याचा पूर्ण अधिकार आहे. शाहंच्या आजच्या उत्तरावर विरोधकांनी प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली आहे.

एनआरसी आणि सिटीजनशिप ही दोन्ही विधयके वेगवेगळी असून विरोधक लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत उत्तर देताना केला.

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.