नुसरत जहाँ आणि यशदास गुप्ता यांचा रोमॅण्टिक व्हिडीओ व्हायरल!

मुंबई : तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि बंगाली चित्रपट अभिनेत्री नुसरत जहाँ यांनी नुकताच बाळाला जन्म दिला आहे. एकीकडे नुसरत यांच्या बाळाचे वडील कोण याबाबत नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरु असतानाच आता नुसरत जहाँ आणि त्यांचा कथित प्रियकर यशदास गुप्ता यांचा एक रोमॅण्टिक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

नुसरत जहाँ यांनी पती निखल जैन यांच्यापासून विभक्त झाल्याचं जाहीर केल्यापासूनच त्या चर्चेत आल्या आहेत. तसचं त्याचं नावं अभिनेता यशदास गुप्तासोबत जोडलं जातं आहे. अशातच नुसरत यांनी इन्स्टाग्रामवरील त्यांच्या चाहत्यांनी तयार केलेला एक व्हिडीओ त्यांच्या इन्स्टास्टोरीला शेअर केला होता. या व्हिडीओत नुसरत आणि यशदास यांच्यातील केमिस्ट्री पाहायला मिळतेय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

नुसरत जहाँ आणि यशदास गुप्ता यांच्या फॅनग्रुपने हा व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी नुसरत आणि यशदास यांना शुभेच्छा दिल्या आगेत. “ईशानच्या जन्माच्या यशरत यांना शुभेच्छा” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलंय. नुसरत जहाँ यांनी हा व्हिडीओ त्यांच्या इन्स्टास्टोरीला शेअर केल्याने नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा