व्हिडिओ शेअर करत भाजप नेत्यांचा नुसरत जहांवर निशाणा; लग्न केलं नाही मग संसदेत जे काही बोलल्या ते खोटं होतं का?

मुंबई : बंगाली चित्रपट अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसची खासदार असणारी नुसरत जहांने २०१९ साली निखिल जैनसोबत तुर्की येथे लग्नगाठ बांधली होती. परंतु आता नुसरतने आपलं परदेशात झालेलं लग्न मान्य नसल्याचं म्हटल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. नुसरतने तिच्या इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाउंटवरून लग्नाचे सगळे फोटोदेखील डिलिट केले आहेत. हे पाहून भाजप नेते अमित मालवीय यानी तिला प्रश्न विचारले आहेत.

अमित यांनी ट्विट करत नुसरतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात नुसरत साडी नेसून एखाद्या नववधूप्रमाणे संसदेत उभी आहे. हा व्हिडीओ शेअर करत अमित यांनी लिहिलं, ‘कोणासोबत राहायचं आणि कोणासोबत लग्न करायचं हा टीएमसी संसद सदस्य नुसरत जहां यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु त्यांना जनतेने निवडून दिलं आहे. त्यांनी संसदेत निखिल जैनसोबत लग्न झाल्याची गोष्ट मान्य केली होती आणि त्या गोष्टीचा पुरावादेखील आहे. मला त्यांना विचारायचं आहे की, त्या वेळेस नुसरत संसदेत जे काही बोलल्या ते खोटं होतं का?’ असा प्रश्न विचारत अमित यांनी नुसरला धारेवर धरलं आहे.

नुसरने तुर्कीमध्ये लग्न झाल्याने ते भारतात मान्य नसल्याचं सांगत निखिलसोबत असलेले सगळे संबंध तोडले. भारतात लग्न अमान्य असल्याने घटस्फोट घेण्याचा प्रश्नच येत नाही, असं म्हणत नुसरतने आम्ही लिव्ह-इनमध्ये राहत असल्याचं सांगितलं. निखिलने मात्र त्याला लग्न मान्य असल्याचं म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा