NZ vs IND 1St T20I | पावसाने घातला धुमाकूळ, सामना वॉशआऊट

वेलिंग्टन: न्यूझीलंड विरुद्ध भारत (NZ vs IND) हा पहिला टी 20 (T20) सामना आज वेलिंग्टन (Wellington) येथे खेळला जाणार होता. मात्र, वेलिंग्टनमध्ये तुफान पावसाने हजेरी लावल्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला आहे. एकही चेंडू न टाकता हा सामना रद्द करावा लागला आहे. नाणेफेक सुरू असतानाच पावसाने हजेरी लावल्यामुळे दोन्ही संघाला पॅव्हिलियन मध्ये परतावे लागले आहे. स्थानिक हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पुढील चार-पाच दिवस पाऊस थांबण्याची शक्यता दिसत नाही. आता भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ 20 नोव्हेंबरला मालिकेच्या दुसऱ्या टी 20 सामन्यांमध्ये आमने-सामने येतील.

भारत विरुद्ध न्यूझीलंड या सामान्यादरम्यान वेलिंग्टनमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, स्काय स्टेडियम वरील फक्त खेळपट्टी झाकण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आज होणाऱ्या पहिल्या टी 20 सामन्यावर पाणी फिरण्याची भीती निर्माण झाली होती आणि ती खरी ठरली आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड हा वेलिंग्टनमध्ये होणारा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे.

टी 20 विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघ हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी वेलिंग्टनमध्ये सुरू होत असलेल्या तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेमध्ये आपली छाप पाडण्यासाठी उत्सुक होता. मात्र, पावसाने भारतीय संघाच्या या उत्सुकतेवर पाणी फिरले आहे. या सामन्यांमध्ये भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये युवा खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची संधी उपलब्ध आहे. पण पावसामुळे पहिला सामना रद्द झाल्याने खेळाडू निराश झाले आहेत.

भारतीय संघाने गेल्या दोन वर्षांत टी 20 फॉर्मेटमध्ये दोन विश्वचषक खेळले आहे. यामध्ये येथे 2021 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघ पहिल्या फेरीत बाहेर पडला होता. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये पोहोचून भारताला हार स्वीकारावी लागली होती. अशा परिस्थितीमध्ये भारतीय संघाला 2024 मध्ये वेस्ट इंडिज येथे होणाऱ्या पुढील टी 20 विश्वचषकासाठी चांगलीच तयारी करावी लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.