‘ओ..घुंगरू सेठ…तुम्ही किंमत चुकवलीये थेट’, चित्रा वाघ यांचा राऊतांवर हल्लाबोल

मुंबई : राज्यात गाजलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपाच्या चौकशीसाठी राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे माजी गहृमंत्री अनिल देशमुख ईडीच्या कोठडीत आहेत. यावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार नागपुरात बोलताना निशाणा साधला होता. यावेळी त्यांनी देशमुखांना जो त्रास दिला जात आहे, त्याचा एक-एक मिनीट मी वसूल करेन, असा इशारा दिला आहे.

पवारांच्या या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांची पाठराखण केली होती. “आमचे अनिल परब आहेत, प्रताप सरनाईक आहेत. आम्हीच तुम्हाला दिसतोय का? तुमच्या पक्षामध्ये चमचा मंडळ आहे. त्यात सगळे धुतल्या तांदळातले आहेत का?, असा सवाल करत ते पुढे म्हणाले, आम्ही जो त्रास भोगलेला आहे. त्या प्रत्येक सेकंदाची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल,” असा इशाराच त्यांनी यावेळी दिला आहे.

राऊत यांच्या या वक्तव्यावर भाजप नेत्या चित्रा वाघ आक्रमक झाल्या असून यासंदर्भात त्यांनी ट्विट केले आहे. ‘पापाची किंमत चुकवावी लागणार असल्याची भाजपला धमकी देणा-या संजय राऊत यांनी आधीच आपल्या पापाची किंमत #ईडी कडे चुकवलीय… तब्बल ५५ लाख रूपये. ओ..घुंगरू_सेठ.. तुम्ही किंमत चुकवलीये थेट’, असे ट्विट करत चित्रा यांनी राऊतांवर टीकास्त्रांचा प्रहार केला आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा