देवेंद्र फडणवीसांनी ‘ते’ परिपत्रक काढलं म्हणून ओबीसी आरक्षण धोक्यात आलं : नाना पटोले

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ओबीसी आरक्षणावरून राज्यच राजकारण ढवळून निघालं आहे. भाजपने आज राज्यभरात ओबीसींच्या आरक्षणावरून राज्य सरकारच्या निषेधार्थ आंदोलन सुरू केलं आहे. भाजपच्या या आंदोलनावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसच ओबीसींच्या आरक्षणाचे मारेकरी आहेत. त्यामुळे भाजपने या दोघांविरोधात आधी आंदोलन करावे. राज्य सरकार विरोधातील आंदोलनाची नौटंकी बंद करावी. तसेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक असणारं इम्पिरीकल डेटा उपलब्ध केला नाही. राज्यातील भाजपने ओबीसींचं आरक्षण संपवण्याचं काम केलं आहे, असा घणाघाती हल्ला नाना पटोले यांनी चढवला आहे.

केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी न दिल्याने व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिपत्रक काढून जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलल्याने फक्त महाराष्ट्राच नाही तर देशातील ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे. आंदोलनाची नौटंकी करून त्यांना आपले पाप झाकता येणार नाही. या शब्दात नाना यांनी भाजप नेत्यांवर टीका केली आहे.

दरम्यान, सध्या ओबीसी आरक्षणावर आपली आक्रमक भूमीका नाना पटोले यांनी कायम ठेवली आहे. ओबीसी आरक्षणासाठी नाना राज्यभर मेळावे घेत आहेत. राज्यातील प्रत्येक ओबीसी नेत्यांला आरक्षणासाठी एकत्र येण्याचं आवाहन नाना पटोले करत आहेत. नाना पटोले यांच्या टीकेनंतर राज्यातील राजकारणात आता जोरदार जुगलबंदी पहायला मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा