ओबीसी आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार: विजय वडेट्टीवार

मुंबई : आज मुंबईत मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संभाजीराजे यांची बैठक झाली. त्यानंतर आता ओबीसी आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.

“ओबीसी आरक्षणासाठी महत्त्वाचा असलेला इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचं काम आयोगाला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, कोरोनाचं संकट असल्याने डेटा गोळा करणं कठिण आहे. त्यामुळे केंद्राकडून डेटा मिळावा म्हणून आम्ही कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहोत. कोरोना संकटात डेटा गोळा करता येईल का? याबाबत कोर्टाचं मतही जाणून घेणार आहे,” असं वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.

“ओबीसींचा इम्पिरिकल डेटा मिळावा म्हणून आम्ही केंद्राला दोन पत्रं लिहिली आहेत. पण डेटा मिळाला नाही. मुख्यमंत्र्यांनीही इम्पिरिकल डेटा बाबत पंतप्रधानांना विनंती केली आहे. हा डेटा मिळाला नाही तर सहकार क्षेत्रापासून ते स्थानिक स्वराज्य संस्थेपर्यंतच्या अनेक निवडणुकांमधील 40 ते 50 हजार जागांवर प्रश्नचिन्हं निर्माण झाले आहेत,” असं वडेट्टीवार म्हणाले.

“ओबीसी आरक्षणातील अडथळे कोणते आहेत? ते कसे दूर करता येतील? त्यावर काय उपाय आहेत? याबाबतचं चिंतन करण्यासाठी विजय वडेट्टीवार यांनी लोणावळ्यात एका शिबीराचं आयोजन केलं आहे,” असंही त्यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा