ODI World Cup | भारतातील ‘या’ स्टेडियममध्ये रंगणार IND vs Pak वर्ल्ड कप सामन्याचा थरार
ODI World Cup | मुंबई: क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान (IND vs Pak) सामन्याचा थरार पाहण्यासाठी चाहते नेहमी अतुर असतात. 1992 पासून वनडे असो किंवा टी-20 दोन्ही स्पर्धेमध्ये भारत आणि पाकिस्तान आमने सामने आले आहेत. कारण या स्पर्धेमध्ये भारत-पाकिस्तान सामना नसेल, तर वर्ल्ड कपला मजाच येणार नाही. त्यामुळे या सामन्याची क्रिकेट चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत असतात.
5 ऑक्टोबर 2023 पासून वनडे वर्ल्ड कप (ODI World Cup) स्पर्धेला सुरुवात होणार आहे. इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल संपल्यानंतर BCCI वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर करणार आहे. यामध्ये सर्व क्रिकेट रसिकांना भारत पाकिस्तान सामन्याची उत्सुकता लागली आहे.
‘या’ ठिकाणी रंगणार IND vs Pak वर्ल्ड कप सामना (IND vs Pak World Cup match will be played at ‘this’ place)
मीडिया रिपोर्टनुसार, यावर्षी वर्ल्ड कप (ODI World Cup) मधील भारत-पाकिस्तान सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम आहे. या स्टेडियममध्ये एका वेळी तब्बल एक लाख प्रेक्षक बसू शकतात. भारत-पाकिस्तान सामना बघण्यासाठी परदेशातून सुद्धा मोठ्या प्रमाणात चाहते येतात. त्यामुळे बीसीसीआयने या सामन्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियम निवडले आहे.
वनडे वर्ल्ड कपमध्ये (ODI World Cup) एकूण 48 सामने होणार आहेत. त्यानंतर बाद फेरीचे तीन राऊंड होतील. यावर्षी तब्बल 48 दिवस ही स्पर्धा चालणार आहे. टीम इंडियाने फायनलमध्ये प्रवेश मिळवलाच तर तिथे भारताला दोन सामने खेळावे लागतील.
महत्वाच्या बातम्या
- Weather Update | राज्यात आजही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना बसणार फटका
- Ajit Pawar | शरद पवारांनी ठरवलं तर अध्यक्ष होणार का? अजितदादा काय म्हणाले?
- Abdul Sattar | “मी ‘कुत्रा’ निशाणीवर जरी लढलो, तरी जिंकणार” : अब्दुल सत्तार
- Job Opportunity | विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्रात नोकरीची संधी! आजच करा अर्ज
- Sharad Pawar | शरद पवारांनी 2024 पर्यंत तरी अध्यक्ष राहावं; ‘या’ नेत्यांनं व्यक्त केली इच्छा
Comments are closed.