Odisha Train Accident | अखेर बाप, बाप असतो! रेल्वे अपघातात शवगृहातून आपल्या मुलाला शोधलं जिवंत

Odisha Train Accident | बालासोर: ओडिसा राज्यातील बालासोर येथे गेल्या पाच दिवसांपूर्वी भीषण रेल्वे अपघात झाला. या अपघातातील प्रवाशांचा अजूनही शोध घेणे सुरू आहे. रेल्वेच्या या भीषण अपघातामध्ये आतापर्यंत 288 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर अपघातस्थळी लोक आपली माणसं शोधण्यासाठी धडपड करत आहेत.

The father reached the accident site to search for his son

रेल्वे अपघात झाल्यानंतर एक वडील आपल्या मुलाचा शोध घेण्यासाठी अपघात स्थळी (Odisha Train Accident) पोहोचले. तुमचा मुलगा जिवंत नाही, अशी माहिती त्यांना बचावकर्त्यांनी दिली होती. मात्र, मुलगा जिवंत असल्याची अशा वडिलांच्या मनात होती. शोध घेतल्यानंतर त्यांना त्यांचा मुलगा शवगृहामध्ये जिवंत सापडला.

विश्वजीत मलिक नावाचा 24 वर्षीय तरुण कोरोमंडल एक्सप्रेसमधून प्रवास करत होता. अपघात झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली होती. मात्र, त्याच्या वडिलांनी अपघात स्थळी (Odisha Train Accident) येऊन स्वतः मुलाचा शोध घेतला.

विश्वजीतच्या वडिलांना रुग्णालयात तो सापडला नाही. त्यानंतर ते त्याला शोधण्यासाठी शवगृहात गेले. तिथे त्यांना एका मृतदेहाचा हात हालताना दिसला. त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हात विश्वजीतचा आहे. विश्वजीत सापडला तेव्हा पूर्णपणे बेशुद्ध होता. त्यानंतर विश्वजीतला त्याच्या वडिलांनी तात्काळ रुग्णालयात नेले. शुद्धीवर आल्यावर त्यांनी मुलाला पुढील उपचारासाठी कोलकत्याला नेले.

दरम्यान, ओडिसा येथील बहानगा बाजार रेल्वे स्थानकावर भीषण अपघात (Odisha Train Accident) झाला आहे. यामध्ये कोरोमंडळ एक्सप्रेस आणि मालगाडी यांची टक्कर झाली होती. त्यानंतर या गाड्यांना हावडा एक्सप्रेसने धडक दिली. या अपघातानंतर देशात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3qv51qt