‘महाराष्ट्र बंद’ : माढा कुर्डूवाडी परिसर 100% बंद

कुर्डूवाडी प्रतिनीधी – हर्षल बागल : सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंद ला कुर्डूवाडी शहर व परिसरातील सर्वच ठिकाणी कडेकोट इतिहासातील सर्वात मोठा बंद पाळण्यात आला. आज गुरुवार चा साप्ताहिक बाजार असुनही, मार्केट कमिटी, भाजीपाला व फळ विक्रेते, यांच्यासह शहरातील अत्यावश्यक सेवा सोडुन कडकडित बंद पाळण्यात आला. दि. 8 रोजी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शहरातील रँली काढुन बंदचे अवाहन करण्यात आले.

आज सकाळच्या सुमारास सकल मराठा समाजाच्या वतीने शहरातुन मोटारसाईकल रँली काढण्यात आली. सर्व प्रमुख रस्त्यावरुन फिरुन रँली शिवाजी चौक येथे अाली असता तेथे मराठा आंदोलनात स्वताचे बलिदान देणाऱ्या त्यासोबत षहिद मेजर राणे यांना स्तब्धता पाळुन श्रध्दांजली वाहण्यात आली. कुर्डूवाडी शहरातील सर्व रस्ते , बायपास येथे तरुळक वाहतुक सुरु होती , रस्त्यावर चार चाकी एकही वाहन दिसत नव्हते. तालुक्याक्यातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद होती. शहरातील एस.टी.सेवा , माढा तालुका मोटार चालक मालक , यांच्यासह विविध संघटनांनी आज वाहतुक बंद करुन मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला. साप्ताहिक मंडई , साप्ताहीक जनावरांचा बाजारही बंद होता . यावेळी शहरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
विठ्टल कार्पोरेशन म्हैसगाव , चिंचगाव , भोसरे यांच्यासह तालुक्यातील सर्वच ठिकाणी बंद शंभर टक्के प्रतिसाद जनतेने दिला. माढा तालुका बंद ठेवण्यासाठी सकल च्या आंदोलकांनी परिश्रम घेतले . कोणतेही गालबोट या आंदोलनाला लागले नाही शांततेत कायदेशिर मार्गाने हा बंद सर्व मराठा समाजाने पाळण्यात आला. शहर व तालुक्यातील इतर समाजानेही प्रतिसाद दिला.

 

मराठा आंदोलन : कुर्डूवाडीत आंदोलकांनी बोकडाला बनवले मुख्यमंत्री

महत्वाच्या बातम्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.