InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

भाजपात सहभागी होण्यासाठी 40 कोटींची ऑफर

- Advertisement -

कर्नाटकात सध्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या विजयानंतर सत्ताधारी पक्षात येण्यासाठी अनेक विरोधी पक्षाचे आमदार उत्सुक आहेत. कर्नाटकातील पेरियापटना येथे जेडीएस आमदार महादेव यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात आरोप लावला आहे, की काँग्रेस आमदार रमेश जरकिहोली यांनी काँग्रेस पक्षात राहण्यासाठी 80 कोटी रुपये मागितले आहेत तर भाजपात प्रवेश करण्यासाठी मला 40 कोटींची ऑफर मिळाली मात्र मी त्यास नकार दिला असं जेडीएसच्या आमदाराने सांगितले.

जेडीएस आमदाराने दावा केला की, माझ्या उपस्थितीत जरकिहोली यांनी 80 कोटी रुपयांची मागणी केली होती. तसेच मला भाजपात सहभागी होण्यासाठी 40 कोटींची ऑफर दिली मात्र मी भ्रष्टाचारविरोधी ब्युरोकडे तक्रार करण्याची धमकी दिली. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते सिद्धरामय्या यांनी भाजपा कर्नाटक सरकार पाडण्याचा डाव करतंय असा आरोप केला आहे.

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.