अरे देवा! बबिताने समुद्र किनारी हे काय केलं? फोटो आले समोर

मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम बबीता म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ता गेल्या काही दिवसांपासून तिच्या फोटोमुळे तर कधी तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. मूनमुन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ही चर्चा तिने शेअर केलेल्या फोटोमुळे होत आहे.

मुनमुन दत्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो २०१७ सालातील आहेत. या फोटोत ती मडबाथचा आनंद लुटताना दिसत आहे. मुनमुनने जॉर्डनमधील ‘डेड सी’ च्या समुद्र किनाऱ्यावर मडबाथ घेत असतानाचे तीन फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत मोनोकिनी परिधान केलेल्या मुनमुनने तिच्या संपूर्ण शरीरावर समुद्र किनाऱ्यावरील मातीचा लेप लावल्याचं दिसतंय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय, ”डेड सी आणि आरोग्यदायी मड बाथ…जॉर्डन २०१७”. मुनमुन दत्ताचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोंना तिच्या अनेक चाहत्यांनी पसंती दिली आहेत.

महत्वाच्या बातम्या

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा