अरे बापरे! प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर एक पोस्टसाठी घेते चक्क ‘इतके’ पैसे 

मुंबई : बॉलीवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्राने आपल्या अभिनयाने बॉलीवूडच नाहीतर हॉलिवूडमध्ये देखील एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. पण तुम्हाला हे माहीत आहे का? की प्रियांका एका पोस्टसाठी तब्बल तीन कोटी रुपयांपर्यंतच मानधन घेते.

‘हॉपरएचक्यू’ या वेबसाईटनं सोशल मीडियावरील सर्वात श्रीमंत सेलिब्रिटींची यादी जाहिर केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या यादीत बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा 27 व्या स्थानावर आहे. वेब साईटनं केलेल्या दाव्यानुसार तिला एका पोस्टसाठी कमीतकमी 3 कोटी रुपयांचं मानधन दिलं जातं.

या यादीत एकूण 395 सेलिब्रिटींचा सामावेश करण्यात आला आहे. त्यात विल स्मीथ, डेव्हिड बेकम, एमा वॉटसन यांसारखे अनेक नामांकित हॉलिवूड सेलिब्रिटी आहेत. या यादीत पहिल्या तीस सेलिब्रिटींमध्ये केवळ दोन भारतीय आहेत. प्रियांकासोबत भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली याची वर्णी लागली आहे. तो 19 व्या स्थानावर आहे. त्याला एका पोस्टसाठी जवळपास पाच कोटी रुपये दिले जातात.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा