Oil Free Samosa | तेलाचा वापर न करता ‘या’ पद्धतीने बनवा भाजलेले समोसे

टीम महाराष्ट्र देशा: तेलकट पदार्थ (Oily Food) खाल्ल्याने आपले आरोग्य बिघडते. त्यामुळे आवड असताना देखील आपण अनेकदा हे पदार्थ खाणे टाळतो. त्याचबरोबर आरोग्याच्या भीतीपोटी आपण आवडत असलेले समोसे (Samosa) अनेकवेळा खाणे टाळतो. कारण समोस्यामध्ये तेलाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे आपण त्याचे सेवन करणे नेहमी टाळत असते. पण तुम्हाला माहित आहे का? तेलाशिवाय (Oil Free Samosa) देखील समोसा बनू शकतो. होय! तेलाचा वापर न करता आपण स्वादिष्ट समोसा बनवू शकतो. त्याच्याच रेसिपी बद्दल आम्ही आज तुम्हाला या बातमीच्या माध्यमातून माहिती सांगणार आहोत.

तेलाशिवाय समोसा (Oil Free Samosa) बनवण्यासाठी लागणारे साहित्य

तेलाशिवाय समोसा बनवण्यासाठी तुम्हाला मैदा – 2.5 कप (350ग्रॅम), मीठ -1/2 चमचे पेक्षा जास्त, बेकिंग पावडर – बेकिंग पावडर – 1/2 टीस्पून, तेल – १/२ कप, तेल – 1 टेस्पून, आले – १ टीस्पून किसलेले, हिरवी मिरची – २ बारीक चिरून, जिरे पावडर – 1 टीस्पून, धने पावडर – 1 टीस्पून, बटाटे – 5, मॅश केलेले (350 ग्रॅम), वाटाणे – १/२ कप, लाल तिखट – 1 टीस्पून, सुकी आमचूर पावडर – 1/2 टीस्पून, गरम मसाला – 1/4 टीस्पून, मीठ – 1/2 टीस्पून पेक्षा जास्त, धणे – 1-2 चमचे इत्यादी साहित्य लागेल.

भाजलेले समोसे बनवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला मैदा चांगला मळून तयार करून घ्यावा लागेल. हे पीठ तुम्हाला मैद्यासोबत गव्हाचे पीठ, मीठ, कॅरम बिया, बेकिंग पावडर मिक्स करून थोडे थोडे पाणी घालून घट्ट मळून घ्यावे लागेल. हे पीठ तयार करण्यासाठी साधारण अर्धा कप पाण्याचा वापर करा. हे पीठ मळण्यासाठी तुम्हाला थंड पाण्याचा वापर करावा लागेल. व्यवस्थित पीठ मळून झाल्यावर हे पीठ एका मऊ कापडामध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्या. आता कुकरमध्ये तीन ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये बटाटे शिजवायला ठेवा. व्यवस्थित बटाटे शिजल्याने त्यांना सोलून हाताने मॅश करून घ्या. पीठ आणि बटाटे मॅश करून झाल्यावर समोसा भरण्यासाठी मसाला फिलिंग तयार करा.

समोस्याचा फिलिंग मसाला तयार करण्यासाठी तुम्हाला गॅसवर एक पॅन ठेवून गरम करून घ्यावा लागेल. त्यानंतर त्या पॅनमध्ये एक टीस्पून तेल, एक टीस्पून जिरे, एक टीस्पून धने पावडर टाकून मंद आचेवर फोडणी करून घ्यावी लागेल. त्यानंतर त्यामध्ये मटार आणि मॅश केलेले बटाटे मिक्स करून घ्या. हे मिश्रण व्यवस्थित झाल्यानंतर त्यामध्ये मसाले टाकायला सुरुवात करा.

मॅश केलेले बटाटे आणि मटारच्या मिश्रणामध्ये तुम्हाला सर्वप्रथम अर्धा चमचा आमचूर पावडर, दीड चमचा तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, एक चमचा धने पावडर, चवीनुसार मीठ, एक ते दोन बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकावी लागेल. हे सर्व मसाले बटाटे आणि मटर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या. मिक्स केल्यानंतर हे सगळे मसाले एकत्र करून व्यवस्थित परतून घ्या. यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की बटाटे जास्त मॅश करू नका किंवा जास्त घट्ट करू नका. त्याचबरोबर बटाटे न किसता हातानेच त्याला मॅश करा. हे मिश्रण सात ते आठ मिनिटे गॅसवर ठेवून चांगले परतून घ्या. हे करत असताना तुमचा गॅस मंद आचेवर असावा.

एकीकडे मसाला तयार होत असताना दुसरीकडे तुमचे पीठ चांगले तयार होईल. तयार झाल्यानंतर पिठाला थोडीसे मळून घ्या. त्यानंतर आता समोस्यासाठी पीठ घेऊन त्याला चपाती आकारामध्ये लाटायला सुरुवात करा. यासाठी तुम्ही गोलकार किंवा रोलिंग पिनच्या मदतीने अंडाकृतीमध्ये लाटू शकता. लाटताना गोलाकार चपाती जास्त पातळ करू नका. पीठ चपातीच्या आकारामध्ये लाटल्यानंतर सुरीच्या किंवा चाकूच्या मदतीने त्याचे दोन समान भाग करून घ्या. यानंतर एका भागाला पाणी लावून, त्याला समोस्याचा आकार द्या.

तयार झालेले हे त्रिकोण भरण्यासाठी तुम्हाला तयार केलेला अर्धा चमचा मसाला त्यामध्ये भरावा लागेल. मसाला व्यवस्थित भरल्यानंतर त्याला पाणी लावून हलक्या हाताने कोपरे चिटकवून घ्या. आता समोसे आपण तळण्याऐवजी भाजणार आहोत. त्यामुळे तुम्हाला अर्धा कप दुधात दोन चमचे मलाई मिक्स करून समोसांना लावून घ्यावी लागेल.

समोसा बेक करण्यासाठी समोसे बेकिंग ट्रेमध्ये ठेवा. त्याचबरोबर ओव्हनमध्ये 200 डिग्री सेंटीग्रेड प्रिहिट करून घ्या. यानंतर समोसे साधारण पंचवीस मिनिटे बेक करावे लागेल. 25 मिनिटानंतर समोसे बाहेर काढून चमच्याने दाबून तपासा. समोसे जर व्यवस्थित पद्धतीने भाजले असेल तर ते तुमच्या खाण्यासाठी तयार आहेत. तुमच्याकडे ओव्हन असेल तर तुम्ही कुकरमध्ये देखील समोसे भाजू शकतात. यासाठी तुम्हाला कुकरमध्ये दोन वाट्या मीठ टाकून त्यावर जाळीचा स्टॅन्ड ठेवावा लागेल. स्टँडवर समोसे ठेवून कुकरला झाकण लावा. त्यानंतर 25 मिनिटे समोसे शिजवून दिल्यावर तुमचे भाजलेले समोसे तयार होतील.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.