Ola Electric Bike | इलेक्ट्रिक स्कूटर आणि कारनंतर Ola लवकरच लाँच करणार आहे इलेक्ट्रिक बाईक

टीम महाराष्ट्र देशा: देशात सध्या दिवसेंदिवस इलेक्ट्रिक वाहन Electric Vehicles चा ट्रेंड वाढत चालला आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहन निर्माते कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन इलेक्ट्रिक वाहने लॉंच करत आहे. दरम्यान, देशातील आघाडीची इलेक्ट्रिक वाहन उत्पादन कंपनी Ola लवकरच आपली नवीन इलेक्ट्रिक बाईक Electric Bike लॉंच करण्याच्या योजनेत आहे. Ola ने आपली इलेक्ट्रिक स्कूटर Electric Scooter लाँच केल्यानंतर इलेक्ट्रिक कार Electric Car चे अनावरण केले आहे. आता कंपनी आपली इलेक्ट्रिक बाईक लाँच करण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार कंपनी आपली इलेक्ट्रिक बाईक 2024 पर्यंत लाँच करू शकते.

लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर Ola S1 Air च्या लाँच दरम्यान Ola चे CEO भावी अग्रवाल म्हणाले होते की कंपनी आता इलेक्ट्रिक स्कूटर आणि कारसह लवकरच इलेक्ट्रिक बाईक लाँच करण्याच्या तयारीत आहे. या बाईक बद्दल पुढच्या वर्षी होईपर्यंत सविस्तर माहिती मिळू शकते.

ओला इलेक्ट्रिक बाईक

मिळालेल्या माहितीनुसार, Ola ची येणारी ही इलेक्ट्रिक बाईक मध्यम आकाराची असून प्रीमियम रेंजमध्ये असेल. ही बाईक प्रीमियम रेंजमध्ये जरी असली तरी ती हाय परफॉर्मन्स बाईक म्हणून ओळखल्या जाण्याची शक्यता आहे. ही इलेक्ट्रिक बाइक नॉर्मल मोडमध्ये प्रति चार्ज 120 ते 150 किलोमीटरचा वेग देण्यात सक्षम असेल.

Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटर

Ola S1 (180km) ही देशातील सर्वोत्तम रेंज देणारी इलेक्ट्रिक स्कूटर आहे. Ola च्या या स्कूटरचे बाजारात दोन प्रकार उपलब्ध आहेत. यामध्ये S1 आणि S1 Pro यांचा समावेश आहे. Ola S1 ही इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जर 180km पर्यंत रेंज देऊ शकते. सध्या ही स्कूटर बाजारामध्ये 10,000 रुपयांच्या डिस्काउंट उपलब्ध आहे. या इलेक्ट्रिक स्कूटर ची एक्स-शोरुम किंमत 1.40 लाख रुपये आहे.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.