Old pension | मुंबई : गेल्या ७ दिवसांपासून राज्यातील सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्यातील लाखो कर्मचारी संपावर होते. अखेर त्यांच्या मागणी मान्य करण्याचं आश्वासन राज्य सरकारने दिलं आहे. त्यामुळे आता संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी आता संप मागे घेण्याची घोषणा केली आहे. जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येईल असं आश्वासन सरकारने दिलं असल्याचं संपातील समन्वय समितीकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आजपासून हा संप मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे
सरकारशी संपकरी कर्मचाऱ्यांच्या संघटनांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत चर्चा झाली असून ती यशस्वी झाल्याचं संघटनेच्या समन्वयकांकडून जाहीर करण्यात आलं आहे. कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याच्या मागणीचा प्राथमिक स्तरावर स्वीकार केल्याचे आश्वासन सरकारने दिल्याचंही आंदोलकांच्या समन्वयकांकडून सांगण्यात आलं आहे.
विधानसभा | अर्थसंकल्पीय अधिवेशन | २०/३/२०२३ https://t.co/s5jPl4q4IM
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) March 20, 2023
गेले ७ दिवस आम्ही संपावर होतो. हा संपकालावधी आमच्या खात्यावरच्या उपलब्ध रजा मंजूर करून तो नियमित करण्यात येईल. ज्यांना कारवाईसंदर्भात नोटीस गेल्या आहेत, त्या मागे घेण्यात येतील, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहितीही कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली आहे. ‘शासनाने संवेदनशील भूमिका घेऊन संपकऱ्यांना समजून घेतलं, त्यासाठी आम्ही आभारी आहोत. शासन यावर शीघ्र गतीने कार्यवाही करेल. असा विश्वास आम्हाला वाटतो’, अशीही प्रतिक्रिया विश्वास काटकर यांच्याकडून आली आहे.
मुख्यमंत्री शिंदेंचं सकारात्मक
“राज्यातील सर्व कर्मचारी बंधू-भगिनींनी अभेद्य एकजूट दाखवली. या आंदोलनात कोणतीही हिंसा नव्हती. हा संप त्या सगळ्यांनी यशस्वी करून दाखवला. मुख्यमंत्र्यांबरोबर आज सविस्तर चर्चा झाली. ही चर्चा यशस्वी झाली. कारण आमची मूळ मागणी सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करा अशी होती. शासनाने यासंदर्भात गेल्या सात दिवसांत वेगवेगळी पावलं उचलली आहेत”, अशी माहिती संपकरी कर्मचाऱ्यांचे समन्वयक विश्वास काटकर यांनी दिली आहे.
Announcement of withdrawal of strike by employee unions
“आज सरकारकडून आम्हाला सांगण्यात आलं आहे की, याबाबत ते गंभीर विचार करत आहेत. यासंदर्भात सरकारनं समिती नेमली आहे. ती समिती आधी आम्ही नाकारली होती. पण आज सरकारने एक नवा प्रस्ताव सादर केला. त्यानुसार तत्वत: जुन्या पेन्शन योजनेची संपकऱ्यांची मागणी स्वीकारण्यात आली. जुनी आणि नवी पेन्शन योजना यात मोठं अंतर होतं. यापुढे सर्वांना समान निवृत्तीवेतन मिळेल, त्यात अंतर राहणार नाही अशी भूमिका शासनाने आम्हाला लेखी स्वरूपात कळवली आहे. त्यामुळे जुनी पेन्शन योजना महाराष्ट्रात सुरू होईल. ती निकोप होण्यासाठी समिती त्याबाबत विचार करेल”, अशी माहिती संपकरी कर्मचाऱ्यांचे समन्वयक विश्वास काटकर यांनी माध्यमांना दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
- Budget Session | आशिष शेलार- धनंजय मुंडे यांच्यात तुफान खडाजंगी; मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुन विधानसभेत पुन्हा राडा
- Chhagan Bhujbal | “माझ्या मनातून शिवसेना अजून गेली नाही”; छगन भुजबळांचं वक्तव्य
- Ajit Pawar | ‘शेतकऱ्यांनी नवं वर्ष कसं साजरं करायचं?’; अजित पवार राज्य सरकारवर आक्रमक
- Eknath Khadse | “तुम्ही काय दिवे लागले”; शेतकरी प्रश्नावरुन एकनाथ खडसेंची राज्य सरकारवर टीका
- Braking | अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरण: अखेर बुकी अनिल जयसिंघानी गुजरातमधून अटकेत