Old Pension Scheme: आनंदाची बातमी – जुनी पेन्शन योजनेबाबत शासन घेणार मोठा निर्णय
Old Pension Scheme – जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत मार्ग काढण्यासाठी शासन सकारात्मक असून संबंधित सर्व संघटनांसोबत चर्चा करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य कपिल पाटील यांनी यासंदर्भात नियम 97 अन्वये उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला उपमुख्यमंत्री फडणवीस उत्तर देत होते.
देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले की, लोककल्याणकारी राज्यात समाजातील सर्व घटकांचा विचार करून विविध योजना राबविण्यासाठी अर्थव्यवस्था योग्य राखणे आवश्यक आहे. 2005 साली तेव्हाची परिस्थिती विचारात घेऊन नवीन निवृत्ती योजना लागू करण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेण्यात आला होता. सध्या राज्याचा अत्यावश्यक खर्च अर्थव्यवस्थेच्या 56 टक्के असून वेतन, निवृत्ती वेतन आणि कर्जावरील व्याजावर होणारा हा खर्च मर्यादित ठेवणे आवश्यक आहे. आता जुनी निवृत्तीवेतन योजना पुन्हा लागू केल्यास याचे अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम दिसून येतील.
Devendra Fadnavis -जुनी पेन्शन योजनेबाबत महत्वाची बातमी; शासन मार्ग काढण्यासाठी सकारात्मक
जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबतचा निर्णय विचारपूर्वक घेणे गरजेचे आहे. याअनुषंगाने कर्मचाऱ्यांची भूमिका समजून घेण्याची शासनाची तयारी असून सर्वांनी एकत्र येऊन याबाबत मार्ग काढणे आवश्यक आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते आणि कर्मचारी संघटनांसमवेत चर्चा करण्यासाठी बैठक घेऊन प्रश्न सोडविण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी यासंदर्भातील अल्पकालीन चर्चेच्या उत्तरात सांगितले.
- MLA Escort Goa | भाजपच्या माजी मंत्र्यांला गोव्यात कॉलगर्लकडून मारहाण? एस्कॉर्ट सर्व्हीसचे पैसे कमी दिले
- Chandrakanat Khaire | “सोमय्या ईडीचा दलाल, ईडीच्या पैशातून त्यांना कमिशन मिळतं”- चंद्रकांत खैरे
- Narayan Rane | “येत्या २ महिन्यात नारायण राणेंचं मंत्रिपद जाणार”; ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
- Kalicharan Maharaj | “सत्तेसाठी हिंदूंचा विश्वासघात केल्यानेच नावही गेलं अन् चिन्हही”; कालिचरण महाराजांची ठाकरेंवर जहरी टीका
Comments are closed.