Olive Oil | झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा ऑलिव्ह ऑइल, मिळतील ‘हे’ फायदे

Olive Oil | टीम महाराष्ट्र देशा: ऑलिव्ह ऑइल आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. ऑलिव्ह ऑइलचा वापर प्रामुख्याने स्वयंपाकासाठी केला जातो. त्याचबरोबर त्वचेसाठी देखील ऑलिव्ह ऑइल फायदेशीर ठरू शकते. ऑलिव्ह ऑइलमध्ये आढळणारे गुणधर्म चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करतात. यामध्ये आढळणारे विटामिन ए, विटामिन डी, विटामिन ई, सोडियम, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडेंट यासारखे गुणधर्म त्वचेला पोषण प्रदान करतात. रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला ऑलिव्ह ऑइल लावणे जास्त फायदेशीर मानले जाते. रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला ऑलिव्ह ऑइल लावल्याने खालील फायदे मिळू शकतात.

त्वचा हायड्रेट राहते (Skin stays hydrated-Olive Oil Benefits)

ऑलिव्ह ऑइल त्वचेसाठी नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते. यामध्ये आढळणारे गुणधर्म त्वचेला हायड्रेट ठेवू शकतात. त्याचबरोबर यामध्ये आढळणारे फॅटी ऍसिड त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला ऑलिव्ह ऑइलने मसाज करावी लागेल. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा थंड पाण्याने धुवावा लागेल.

वृद्धत्वाची लक्षणे दूर होतात (Eliminates signs of aging-Olive Oil Benefits)

त्वचेवरील वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यासाठी ऑलिव्ह ऑइल उपयुक्त ठरू शकते. यामध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट गुणधर्म त्वचेला तरुण ठेवण्यास मदत करतात. रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला ऑलिव्ह ऑइल लावल्याने सुरकुत्या बारीक रेषा यासारखी वृद्धत्वाची लक्षणे दूर होऊ शकतात.

त्वचा चमकदार राहते (Skin remains radiant-Olive Oil Benefits)

ऑलिव्ह ऑइलमध्ये भरपूर प्रमाणात विटामिन ई आढळून येते, जे त्वचा चमकदार बनवण्यास मदत करते. रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर ऑलिव्ह ऑइल लावल्याने डाग, पिगमेंटेशन इत्यादी समस्या सहज दूर होऊ शकतात. त्याचबरोबर नियमित याचा वापर केल्याने त्वचेचा रंग सुधारू शकतो.

ऑलिव्ह ऑइलचा वापर केल्याने त्वचेलावरील फायदे मिळू शकतात. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये चेहऱ्यावरील टॅनिंग दूर करण्यासाठी तुम्ही टोमॅटोचा खालील पद्धतीने वापर करू शकतात.

साखर आणि टोमॅटो (Sugar & Tomato For Tannin)

साखर आणि टोमॅटोच्या मदतीने चेहऱ्यावरील ट्रेनिंग दूर करता येऊ शकते. यासाठी तुम्हाला एक टोमॅटो बारीक करून त्यामध्ये एक चमचा साखर मिसळून घ्यावी लागेल. या मिश्रणाच्या मदतीने तुम्हाला साधारण दहा मिनिटे चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा कोमट पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाचा वापर केल्याने त्वचेवरील टॅनिंग हळूहळू दूर होते.

बेसन आणि टोमॅटो (Besan & Tomato For Tannin)

चेहऱ्यावरील टॅनिंग दूर करण्यासाठी बेसन आणि टोमॅटो उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्हाला एक चमचा बेसनामध्ये दोन चमचे टोमॅटोचा रस मिसळून घट्ट पेस्ट तयार करून घ्यावी लागेल. ही पेस्ट तुम्हाला साधारण पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. नियमित याचा वापर केल्याने तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये फरक जाणवेल.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या