InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...

थंडीच्या दिवसात पपई खाणं शरीराला घातक

पपई हे असं फळ आहे जे आपल्याला वर्षभर उपलब्ध होतं. पपईमध्ये व्हिटॅमीन सी आणि ए असल्यामुळे त्यातून ऊर्जा आणि ताकद मिळते. थकवा दूर करणं आणि शरीरातील हार्मोन्स संतुलित करण्याचं काम करत असतं. अनेक आजारांवरील उपाय म्हणून पपई खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र पपईचा गुणधर्म हा मुळात उष्ण आहे. त्यामुळे पपई खाणं हे जितकं फायद्याचं आहे तेवढेच ते खाताना काही गोष्टी लक्षात घेतल्या नाहीत तर त्याचे तोटेही आपल्याला होतात. त्वचा, आतड्यांचे विकार इथपासून ते रक्ताभिसरण आणि पेशींपर्यंत सर्वांसाठी पपई जरी लाभदायक असली तरीही पपई अति खाण्याचे किंवा चुकीच्या वेळी खाल्ल्यानं त्याचे तोटे होतात.

तुमची पचनक्रीया थंडीच्या दिवसांमध्ये थोडी नाजूक झालेले असते त्यामुळे यावेळी पपई खाल्ली तर पचनसंस्थेवर त्यांचा परिणाम होण्याची चिन्हं असतात. पपई पचायला जड असल्यानं अपचनाचा त्रास होऊ शकतो.  त्यामुळे करपट ढेकर येणं, अपचन, जुलाब किंवा उलट्या होण्याचा धोका असतो.  काहीवेळा थंडीत पपई खाल्ल्यानं पोटदुखीचा त्रासही उद्भवण्याची शक्यता असते.

Loading...

१.  गरोदरावस्थेमध्ये स्त्रियांनी पपई खाणे टाळावे. नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार पपई उष्ण असल्याने गरोदर स्त्रियांना त्याचा फार त्रास होतो.

२. रक्तदाबाची समस्या असणार्‍यांमध्ये पपईचं अतिसेवन धोकादायक ठरू शकते.

- Advertisement -

३. पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी पपई खाणं टाळावं.

४. व्हिटॅमिन सीचे शरीरातील प्रमाण वाढल्यास किडनी स्टोन बळावण्याची शक्यतादेखील वाढते.

५. डायबेटीसच्या गोळ्यांसोबत पपईचं सेवन केलं अथवा पपई खाल्ल्यानंतर गोळ्या घेतल्यास त्याचा तब्येतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

६. हृदयासंबंधीत आजार असणाऱ्यांनी पपईचं सेवन डॉक्टरांच्या सल्ल्यानं करावं.

७. पपईचे सेवन केल्यानं त्वचा पिवळी पडत असल्यास आणि प्रामुख्याने तुमच्या हातावरील त्वचा पिवळी पडत असल्यास कॅरोटेनेमिया हा त्वचारोग बळावल्याची शक्यता असते. यामुळे डोळे, तलवे, हाताचा रंग पिवळा पडू शकतो. अशावेळी तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

Loading...
You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.