InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

कुठल्याही दिवशी अचानक युतीची घोषणा होईल – चंद्रकांत पाटील

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका वेगवेगळ्या होणार असल्याचं राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. तसंच ‘युतीचं वैशिष्ट्यं असं आहे की, एखाद्या कुठल्याही दिवशी अचानक युतीची घोषणा होईल’, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. मुंबईत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र होणार की वेगवेगळ्या होणार यासंदर्भात प्रत्येक राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होता.  मात्र चंद्रकांत पाटलांनीच निवडणुका वेगळा होणार असल्याचं जाहीर करत संभ्रम दूर केला आहे.

या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘लोकसभा आणि विधानसभा वेगवेगळ्या होणार आहे, एकत्र होणार नाहीत. याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही. युतीचं वैशिष्ट्यं असं आहे की, एखाद्या कुठल्याही  दिवशी अचानक युतीची घोषणा होईल.’

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.