वाढदिवसानिमित्ताने निकने प्रियंकाला तब्बल एवढ्या लाखाची महागडी दारू केली गिफ्ट

मुंबई : बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राचा काल 18 जुलै रोजी वाढदिवस होता. यावर्षी वाढदिवसानिमित्ताने निक जोनसने गिफ्ट म्हणून प्रियांकाला रेड वाईनची एक महागडी बॉटल  दिली आहे. मात्र या वाईनची किंमत ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.

निकने प्रियांकाला १९८२ सालच एक चेटो माउटंन रोथ्सचाईल्ड पाठवले आहे. प्रियांकाने आपल्या इन्स्टाग्रामवर स्टोअरीवर या दारूच्या बॉटलचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये एक मोठा दारूचा ग्लास दिसत आहे. तसेच पांढरी फुलं, मेणबत्ती आणि छोटं-छोटे खेळण्यातल्या बॉटलने टेबल सजवला आहे. फोटो शेअर करत प्रियांकाने ‘love you @nickjonas’ असे लिहिले आहे.

प्रियांका दिलेल्या रेड वाईन बॉटलची किंमत भारतात एक चांगली बाईक खरेदी करू शकतो, अशी जबरदस्त आहे. ड्रिंकएंडको डॉट कॉमनुसार ही रेड वाईक १९८२ ती चेटो माउटन रोथ्सचाइल्ड एक दुर्मिळ दारू आहे. या ७५० मिलीलीटरच्या बॉटलची किंमत जवळपास १ लाख ३१ हजार ३७५ रुपये इतकी आहे. दरम्यान प्रियांकाच्या वाढदिवसानिमित्ताने पती निक जोनसने आपल्या इन्स्टाग्रामवर पत्नीची एक सुंदर पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये प्रियांकासाठीचे निकने प्रेम जगजाहिर केले होते. निकची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली होती.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा