शेतकरी आंदोलनाबाबत स्वतःच्या वाढदिवसादिवशी युवराजने बोलून दाखवली आपली इच्छा, म्हणाला…

दिल्ली : भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटर युवराज सिंगचा आज वाढदिवस आहे. मात्र, दिल्लीत सध्या शेतकरी आंदोलन पेटले आहे. याच पार्श्वभूमीवर तो आपला वाढदिवस साजरा करणार नाही. शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या लवकर पूर्ण व्हाव्यात अशी इच्छाही त्याने व्यक्त केली आहे.

शेतकरी हे आपल्या देशाची लाईफलाइन आहेत. अशी कोणतीही समस्या नसते की ज्यातून मार्ग निघत नाही. चर्चेच्या माध्यमातून प्रत्येक मुद्दा सोडवता येऊ शकतो. आजचा वाढदिवस साजरा करण्यापेक्षा केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांच्यात सुरु असलेल्या चर्चेतून मार्ग निघावा अशी माझी इच्छा आहे, असे युवराज सिंग म्हणाला.

दरम्यान, तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर ठिय्या मांडला आहे. याबाबत सरकारशी चर्चेच्या फेऱ्या होऊनही त्यातून काहीच निष्पन्न होत नाही,असं शेतकरी संघटना म्हणत आहेत. हे आंदोलन दिवसेंदिवस अधिक आक्रमक होत आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.