नरेंद्र मोदींच्या तीन कृषी कायदे मागे घेण्याच्या घोषणेवर राहुल गांधी म्हणाले….

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी 9 वाजता पुन्हा एकदा देशाला संबोधित केलं. यावेळी मोदींनी देशात नव्याने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यावर भाष्य केलं. आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रानं विरोधकांचा विरोध डावलून संसदेत बळाच्या जोरावर संमत केलेल्या कृषी कायद्यांचा फायदा पुन्हा एकदा वाचून दाखवला.
सोबतच, हे फायदे आपलं सरकार सामान्य शेतकऱ्यांना समजावून सांगू शकलं नाही. या तपस्येत कमी राहिली असं म्हणत त्यांनी देशाची क्षमाही मागितली. तसेच देशवासियांशी संवाद साधताना मोदींनी कृषी कायदे मागे घेण्याची मोठी घोषणा केली. तसेच संसदेत चर्चा झाली, नंतर हे कायदे आणले. देशातील कानाकोपऱ्यातील कोट्यवधी शेतकरी, अनेक शेतकरी संघटनांचे याचे स्वागत केले. मी आज त्या सर्वांचे आभार मानतो.
यावरून आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांनी त्यांचा एक जुना व्हिडीओ ट्वीट करत म्हटलं आहे, की “देशातील बळीराजाने आंदोलन करून गर्वाची मान खाली झुकवली आहे. अन्यायाविरोधात मिळालेल्या या विजयाबद्दल सर्व शेतकऱ्यांचे अभिनंदन,” असं ट्विट त्यांनी केलं आहे. याचबरोबर त्यांनी या ट्विटच्या शेवटी “जय हिंद, जय हिंद का किसान” असंही म्हटलं आहे.
या ट्विटसोबत राहूल गांधीनी शेअर केलेला व्हिडीओ जानेवारी महिन्यातील आहे. यामध्ये त्यांनी शेतकरी आंदोलनाविषयी पत्रकारांशी संवाद साधला होता. यावेळी या व्हिडीओसोबत माझे शब्द लिहून घ्या, “सरकारला एक दिवस हे कृषी कायदे मागे घ्यावे लागतील,” असं कॅप्शन दिलं होतं. राहुल गांधीनी हाच व्हिडीओ शेअर करत शेतकऱ्यांचं अभिनंदन केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- “झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए, अखेर शेतकऱ्यांनी करून दाखवलं”
- “पवार म्हणजे फक्त तडफड, पवारांना कुठेच जम बसवता आला नाही”
- ‘ओ..घुंगरू सेठ…तुम्ही किंमत चुकवलीये थेट’, चित्रा वाघ यांचा राऊतांवर हल्लाबोल
- महाराष्ट्रातील भाजप पुढारी एस.टी.कामगारांची डोकी भडकवीत आहेत : संजय राऊत
- “एसटी कर्मचारी उपाशीपोटी अन् आदित्य ठाकरेंची जनतेच्या पैशावर स्कॉटलंड वारी”