InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

नेत्यांची मोदींच्या सभेला हजेरी, मात्र शहिद जवानाच्या पार्थिवाकडे दुर्लक्ष

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात लढताना शहिद झालेले सीआरपीएफचे निरीक्षक पिंटू कुमार सिंह यांचे पार्थिव आज सकाळी पाटण्यातील विमानतळावर आणण्यात आलं. मात्र यावळी बिहार राज्याच्या मंत्रीमंडळातील एकही सदस्य विमानतळावर उपस्थित नव्हता.

पाटण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची संकल्प सभा असल्यानं राज्याच्या मंत्र्यांनी सभेमध्ये हजेरी लावली, मात्र शहिद जवानाच्या पार्थिवाकडे सर्व नेत्यांनी दुर्लक्ष केले. राज्यातील एक निरीक्षक शहीद होतो आणि त्याच्या अंत्यदर्शनासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार येत नाहीत, ही बाब अतिशय दुर्दैवी असल्याची भावना पिंटू कुमार सिंह यांचे काका संजय सिंह यांनी व्यक्त केली.

यावेळी विमानतळावर जिल्हा दंडाधिकारी कुमार रवी, वरिष्ठ पोलीस अधिकारी गरिमा मलिक, सीआरपीएफचे वरिष्ठ अधिकारी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मदन मोहन झा आणि लोक जनशक्ती पार्टीचे खासदार चौधरी महबूब अली कैसेर उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या – 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply