चिपळूणमधील त्या प्रकरणावर अजित पवारांचा भास्करराव जाधवांना टोला म्हणाले…

सांगली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी चिपळूण आणि खेडमधील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी एका महिलेने मुख्यमंत्र्यांना मदतीची मागणी रेटून धरली. ‘पुराचे पाणी माझ्या घराच्या छतापर्यंत पोहोचलं, आम्हाला मदत करा,’ अशी मागणी ही महिला करत होती.त्याचवेळी विधानसभा तालिका अध्यक्ष आणि शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी त्या महिलेला दमदाटी केली.

हा प्रकार घडल्यानंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. त्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही भास्कर जाधवांवर टोला हाणला. आम्ही लोकप्रतिनिधी कुठेही गेलो तर जनता आपल्या समस्या मांडत असतात. त्यावेळेस त्यांचं ऐकायचं असतं. तिथली परिस्थिती नेमकी काय झालेली आहे. हे मला माहिती नाही.

पण, मी भास्कर जाधवांना ओळखतो. आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केलंय. पण, लोकप्रतिनिधी खासदार, आमदार आणि मुख्यमंत्री कुठंही गेलं तरी जनतेचं म्हणणं ऐकून घेणं आमचं कर्तव्य आहे. ते पार पाडलं पाहीजे’, असं म्हणत अजित पवार यांनी भास्कर जाधवांवर टोला लगावला.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा