एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपुरात सापडले सात कोरोना पॉझिटिव्ह

आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशीच ात सात लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये एका सरकारी अधिकाऱ्याचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता स्थानिक प्रशासनाची चिंता वाढली आहे.
उद्या एकादशी असल्याने पंढरपुरात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आज दुपारपासून पंढरपुरात संचारबंदी लागू होणार आहे. त्यानुसार शहरालगतचा १० किलोमीटरचा परिसर सील केला जाणार आहे.

धक्कादायक बातमी : कोरोना पोहोचला राज ठाकरेंच्या घरी !
उद्या मुख्यमंत्री हेदेखील एकादशीच्या महापूजेसाठी पंढरपूरला जाणार आहेत. यंदा मी एक मुख्यमंत्री नव्हे तर तुमच्या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून विठुरायाच्या दर्शनाला जाणार असल्याचे यांनी सांगितले होते.

अहिल्यादेवी होळकर यांचा मोठा पुतळा सोलापूर विद्यापीठात उभारणार

तर पंढरपुरच्या मंदिरात पहारा देणारे विणेकरी विठ्ठल बढे यांना यंदा मुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठलाच्या महापूजेचा मान मिळाला आहे. मात्र, आता आदल्या दिवशीच कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने पंढरपुरात काहीसे चिंतेचे वातावरण आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.