InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

पहिल्याच दिवशी ‘लाल कप्नान’च्या कमाईला धक्का

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची मुख्य भूमिका असणारा ‘लाल कप्तान’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. चित्रपटाचा टीझर, ट्रेलर आणि पोस्टर पाहता त्याविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळाली होती. पण, प्रदर्शनानांतर मात्र या उत्सुकतेचं रुप पूर्णपणे बदललेलं दिसत आहे.

प्रदर्शनानंतरच्या पहिल्याच दिवशी हा चित्रपट नेमकी कशी कामगिरी करतो याचीच उत्सुकता अनेकांना लागलेली होती. पण, सैफच्या या चित्रपटाच्या वाट्याला सुरुवातीलाच एक जबर धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे. ‘बॉक्स ऑफिस इंडिया’च्या वृत्तानुसार कमाईचा तगडा आकडा ‘लाल कप्तान’ला पाहता आलेला नाही.

Loading...

- Advertisement -

पहिल्या दिवसअखेर या चित्रपटाने फक्त ५० लाख रुपये इतकाच गल्ला कमवला. ज्यामुळे फक्त प्रेक्षकांनाच नव्हे, तर चित्रपच वर्तुळातील अनेकांनाच धक्का बसत आहे. १७६४ च्या बक्सर युद्धानंतरच्या २५ वर्षांनंतरच्या म्हणजेच १८व्या शतकातील कालखंडाच्या आधारे या चित्रपटाचं कथानक साकारण्यात आलं आहे.इंग्रज भारतात त्यांचं वर्चस्व वाढवत असतानाच मराठे, रुहेलखंडी आणि नवाबांमध्ये सुरु असणाऱ्या परस्पर मतभेदांच्या काळातील एक कथा या चित्रपटाच्या माध्यमातून साकारण्यात आली आहे.

Loading...

नवदीप सिंग दिग्दर्शित आणि सैफ अली खान, सोनाक्षी सिन्हा, मानव वीज, दीपक डोबरीयाल यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाकडून अनेकांनाच फार आशा होत्या. पण, हे समीकरण कुठेतरी चुकल्याचं किमान चित्रपटाच्या पहिल्या दिवसाची कमाई पाहून लक्षात येत आहे. सैफच्या कारकिर्दीला कलाटणी देणार, असं म्हणत प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवणारा हा चित्रपट आता येत्या दिवसांमध्ये तरी तिकिटबारीवर समाधानकारक कमाई करतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.