MPSCच्या मुद्द्यावरून पवारांवर राणेंनी साधला निशाणा म्हणाले…

मुंबई : स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 31 जुलैपर्यंत MPSC च्या सर्व रिक्त जागा भरू अशी घोषणा केली होती. आज 1 ऑगस्ट आहे. मात्र अद्यापही पदे भरली नसल्यामुळे भाजप नेते निलेश राणे यांनी एमपीएससीच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

“MPSC मार्फत भरण्यात येणारी सर्व रिक्त पदे 31 जुलै पूर्वी भरण्याची घोषणा अजित पवार यांनी केली होती. मात्र रिक्त पदे अद्याप भरलेली नाही. अजित पवार साहेब तुम्ही लॉलीपॉप बनवायची फॅक्टरी टाका, शोभेल तुम्हाला”, असं निलेश राणेंनी या संदर्भात एक ट्विट केल आहे.

दरम्यान, अजित पवार यांनी केलेल्या या घोषणेवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवसी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांनी एमपीएससीबाबत केलेली घोषणा खोटी असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी याआधी केला होता.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा