‘या’ मुद्द्यावरून पुन्हा राज्यपाल आणि ठाकरे सरकारमध्ये उडाला खटका

राज्यात पुन्हा एकदा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षांच्या निमित्ताने राज्यपाल आणि ठाकरे सरकारमध्ये  खटका उडाला आहे. राज्याचे उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी युजीसीला, शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेण्याबद्दल पत्र लिहिल्यानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

कुमारस्वामींना आता संध्याकाळी सहापर्यंतची डेडलाईन

राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित आपली नाराजी व्यक्त करत केली. इतकंच नाही तर सामंत यांचं हे पत्र म्हणजे विनाकारण केलेला हस्तक्षेप आहे, असं म्हणत सामंत यांना समज देण्यात यावी असंही राज्यपालांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

Loading...

उच्च शिक्षण महाविद्यालयात राष्ट्रगीत बंधनकारक

मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन शेवटच्या वर्षाच्या परीक्षेबद्दल आता तातडीने निर्णय घ्यावा असं देखील राज्यपालांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. उदय सामंत यांनी लिहिलेलं पत्र हे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन आहे, असं राज्यपालांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. राज्यपाल हे राज्यातील सर्व विद्यापीठांचे पदसिद्ध कुलपती असतात आणि असं असताना देखील आपलं मत युजीसीला पत्र लिहिताना विचारत घेतलं गेलं नाही, चर्चा केली गेली नाही ही बाब राज्यपालांना चांगलीच खटकली आहे. त्यामुळेच त्यांनी आपला संताप मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.