InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

ब्राऊन शुगर विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अटक

ब्राऊन शुगर विक्रीसाठी आलेल्या तरुणाला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा अटक करून त्याच्याकडून तब्बल 12 लाख 69 हजार रुपये किंमतीचे 255 ग्रॅम 260 मिली ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई शुक्रवारी दि. 31 ऑगस्ट रात्री इंदिरानगर झोपडपट्टी जवळ करण्यात आली. आरोपीचे नाव अशोक अर्जुन जाधव (वय 34, रा. इंदिरानगर, पुणे) असे आहे. हि कारवाई पोलीस उप आयुक्त ज्योती प्रिया सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply