InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

बंगालमधील ‘त्या’ हिंसाचारानंतर प्रचार एक दिवस आधीच बंद; निवडणूक आयोगाचा ऐतिहासिक निर्णय

पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस व भाजप यांच्यातील झालेल्या हिंसाचाराची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने वातावरण आणखी चिघळू नये यासाठी तेथील लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचा प्रचार ठरल्या वेळेच्या एक दिवस आधीच बंद करण्याचा आदेश दिला. आजवरच्या कोणत्याही निवडणुकीत आयोगाला असे टोकाचे पाऊल उचलावे लागण्याची ही पहिलीच वेळ आहे.

प्रथेप्रमाणे तिथे प्रचार त्याच्या 48 तास आधी म्हणजे 17 मे रोजी सायंकाळी बंद होणार होता. मात्र आता येथील जाहीर प्रचार 16 मेच्या रात्री 10 पासूनच बंद करण्याचा आदेश आयोगाने दिला. त्यानुसार जाहीर प्रचाराखेरीज कोणत्याही प्रकारचे प्रचारसाहित्य कोणत्याही माध्यमातून प्रदर्शित करण्यास पश्चिम बंगालमध्ये प्रतिबंध असेल.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply