InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘एक दिवस मला देखील गोळी घातली जाईल’; ओवैसींचे खळबळजनक वक्तव्य

- Advertisement -

मला पूर्ण विश्वास वाटतो की एक दिवस मला देखील गोळी घातली जाईल. देशात असलेले गोडसेचे वंशज असे करू शकतात. सध्या काश्मीरमध्ये आणीबाणी सारखी परिस्थिती आहे. तेथे फोन चालू आहे ना लोकांना बाहेर पडण्याची परवानगी दिली जात आहे. पंतप्रधान मोदी यांनी घटनेचे पालन करणे आवश्यक आहे आणि तातडीने काश्मीरमधील संचारबंदी मागे घेतली पाहिजे. आज जे जम्मू-काश्मीरच्या लोकांसोबत झाले आहे तेच नागालँड, मिझोराम, आसाम आणि हिमाचल प्रदेशच्या लोकांसोबत देखील होऊ शकते, असा इशारा असदुद्दीन औवैसी  यांनी दिला आहे.

कलम 370 हटवल्यानंतर विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. यात सर्वात आघाडीवर असलेल्या ऑल इंडिया मजलिस ए इत्ताहुदुल मुस्लिमिन चे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन औवैसी  यांनी कलम 370वरून केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. ज्या पद्धतीने काश्मीरमध्ये संचारबंदी आणि अन्य बंदी घातली आहे त्यामुळे तेथील परिस्थिती प्रचंड खराब झाली असल्याचा आरोप औवैसी यांनी केला.

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.